राज्यातील एेंशी हजार शाळा बंद होण्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच धास्तावलेल्या शिक्षणमंत्र्यांनी सारसासारव करताना पुन्हा आडनावात चूक केली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची पाठराखण करताना दिलेल्या स्पष्टीकरण पत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख चक्क कर्मवीर भाऊराव देशमुख असा केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पत्राला प्रतिसाद देताना तावडे यांचे अज्ञान पुन्हा जगासमोर आले. शिक्षण विभागाचे एेंशी हजार शाळा बंद करण्याचे कोणतेही धोरण नाही. याबाबतचे अधिक स्पष्टीकरण देताना तावडे यांनी अनेक महापुरुषांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव देशमुख यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली, या वाक्याने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews